मोठी बातमी : जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणी मुख्य सुत्रधार ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात अनेक घडामोडी होत आहेत. जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी मुख्य सुत्रधार सी.एम. पाटील यांना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अयोध्या नगरमधून शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असून या कारवायांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात अपहार झाल्याप्रकरणी तीन तक्रारी आलेल्या होत्या. या तक्रारीतील जबाबानुसार दुध संघात एकुण 1 कोटी 15 लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमवारी 14 नोव्हेंबर रात्री 9 वाजता संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील, अनिल हरीशंकर अग्रवाल आणि रवी मदनलाल अग्रवाल यांना यापुर्वीच अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल याना अखाद्य तुप खाद्य म्हणून पुरवण्याचे काम केले जात होते. त्या अखाद्य तुपापासून चॉकलेट तयार करून बालकांच्या जिवांशी खेळ केला जात होता.

या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 6 वर पोहचली आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस नाईक रवि पाटील यांनी केली आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यात सी.एम. पाटील यांची चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.