शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला 6 अग्निशमन गाड्या
पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान सर्व 6 नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील अधिकारी यांना वाहनाच्या प्रतिकात्मक चाबी देत लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील भुसावळ, चोपड़ा चाळीसगाव, पाचोरा, जामनेर,अमळनेर या नगरपालिका/नगरपरिषदेसाठी अग्निशामन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ उपस्थित होते.
मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एम एफ आर व्ही ची वैशिष्ट्ये
प्रगत आपत्कालीन प्रतिसाद युनिटचे वाहन हाय प्रेशर वॉटर मीटर सिस्टीम,हाय प्रेशर वॉटर मिटर सिस्टीम,फोम प्रेशर सिस्टीम.आपत्कालीन रेस्क्यू टूल्स (बचाव कार्य साहीत्य). आग, भूस्खलन, पूर, रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा यात आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील आपत्ती झोन पर्यंत पोहोचण्याची क्षमता. जिल्ह्यातील जीवित व वित्तहानीशी सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्ह्याची अग्निशमन यंत्रणा अद्यावत असणे आवश्यक होती, त्याची पूर्तता झाली आहे.