भाजपा पदाधिकाऱ्याला शिवी अन् खेळ खल्लास

जळगावात तोतया पोलिसाचा प्रताप, नागरिकांनो सावध रहा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सराईत गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांवर सध्या तोतया पोलीस भारी पडले आहेत. काही दिवसांपासून या तोतयांनी आपण पोलीस असल्याचे सांगून अनेकांना लुबाडले असल्याच्या घटना राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील उघड होत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासोबत घडली.

जयेश खुमानसिंग ठाकूर (वय ४३) हे जळगाव शहरातील व्यंकटेश कॉलनी येथे राहतात. ते दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग सुकृती अपार्टमेंट येथून जात होते. यावेळी पोलिसाची वर्दी परिधान केलेल्या एका अज्ञात व्यक्तीने जयेश ठाकूर यांची कार अडवून त्यांना दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ केला. यावेळी जयेश ठाकूर यांनी कारच्या बाहेर येऊन सदर व्यक्तीस जाब विचारला तसेच त्याला आपली ओळख दाखवली असता घाबरून तोतया पोलिसाने पोबारा केला. दरम्यान  हा सर्व प्रकार जयेश ठाकूर यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी पोलिसात नोंद केली असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.

म्हणून अशा तोतया पोलिसांपासून  नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.