Wednesday, February 1, 2023

जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशनतर्फे यंदाही सागरपार्क क्रीडा मैदानावर १७ आणि १८ डिसेंबर २०२२ या रोजी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील कॉम्प्युटर डीलर्स, वितरक, सेवा पुरवठादार आणि सभासदासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच स्पर्धेचे यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपणही केले जाणार आहे.

फेसबुक लाईव्ह :-

- Advertisement -

https://fb.watch/hs7MfelUGZ/

जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. १७ डिसेंबरपासून डे क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघांचा सहभाग असणार आहे. व प्रत्येक संघाची नावे त्यांच्या कंपनीच्या नावावर असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रत्येक खेडाळुला ५०० रु. शुल्क आकारण्यात येणार असून त्यांना त्यात असोसिएशनतर्फे क्रिकेट किट मोफत देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघास आकर्षक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संजय चौधरी यांनी केले.
सदर स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील संगणक वितरक, विक्रेते एकत्र येणार आहे. संगणक क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित उत्पादनाचे प्रतिनिधी सुद्धा विविध जिल्ह्यातून येणार आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे