Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»जळगाव डिझेलची टंचाई पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा!
    संपादकीय

    जळगाव डिझेलची टंचाई पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 19, 2026No Comments247 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आज अचानक जळगावतील पेट्रोल पंपांवर अचानक वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्यामुळे ते बंद आहेत. वास्तविक पाहता पेट्रोल पंपांवर पेट्रोल साठा आहे. पण डिझेलच्या साठा संपलेला असल्याने, डिझेल कार, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन हे डिझेलसाठी वणवण भटकत आहेत. एक पेट्रोल पंप सोडून दुसऱ्या पेट्रोल पंपावर तर दुसऱ्या पेट्रोल पंपावरून तिसऱ्या पेट्रोल पंपावर वाहने गेली आणि रिकाम्या हाताने परत आली. डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतीची कामे अडकून पडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर उभे आहेत. ट्रॅक्टर उभे असल्याने शेतीची कामे होत नाहीत. शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. जे लोक दुराचा प्रवास करण्यासाठी निघाले होते त्यांच्या गाड्यांमधील डिझेल संपल्याने चांगली तारांबळ उडाली आहे. एक कारचालक तर म्हणाला की, आम्ही धाराशिव बीड मार्गे जळगावला आलो. वाटेत कुठेच डिझेल मिळाले नाही. सिल्लोडला फक्त 15 लिटर पेट्रोल मिळाले. त्यात आम्ही जळगाव पर्यंत आलो. आम्हाला पुढे नागपूरकडे जायचे आहे. जळगावमध्ये मी चार पेट्रोल पंपवर डिझेल शोधले पण मिळाले नाही. आम्ही आता काय करावे? हे कळत नाही. असा मनस्ताप कारचालक करत होते. एकंदरीत भाव वाढले तर वाढले पण टंचाई का निर्माण झाली? हे मात्र कळत नाही. कृत्रिम टंचाई तर निर्माण केली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026

    एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif