Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव–दिल्ली हवाई सेवा सुरू; ‘अलायन्स एअर’ची नवी उड्डाणे
    ताज्या बातम्या

    जळगाव–दिल्ली हवाई सेवा सुरू; ‘अलायन्स एअर’ची नवी उड्डाणे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments401 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | जळगावकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव विमानतळावरून आता देशाची राजधानी नवी दिल्लीसाठी व्यावसायिक विमानसेवा सुरू होत आहे. ‘अलायन्स एअर’च्या माध्यमातून इंदूरमार्गे ही सेवा १ मे ते ३१ मेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाणार असून, त्याचे अधिकृत वेळापत्रक विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या सेवेमुळे जळगाव-इंदूर हवाई संपर्कालाही मोठी चालना मिळणार आहे.
    सध्या जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ या कंपनीकडून गोवा, पुणे आणि हैदराबादसाठी उड्डाणे सुरू आहेत, तर ‘अलायन्स एअर’मार्फत मुंबई आणि अहमदाबादसाठी सेवा उपलब्ध आहे. आता दिल्लीसाठी थेट सेवा सुरू करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असून, त्याचा शुभारंभ १ मेपासून होणार आहे.
    रेल्वे किंवा रस्त्याने दिल्ली गाठण्यासाठी साधारण १८ ते २४ तासांचा कालावधी लागतो. मात्र, या नव्या विमानसेवेने हा प्रवास अवघ्या ३ तास १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसेच, जळगावहून इंदूरला जाण्यासाठी सध्या ७ ते ८ तास लागतात, परंतु विमानाने केवळ ४० मिनिटांत हा प्रवास शक्य होणार आहे.
    ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. दिल्लीहून दुपारी ४.५० वाजता उड्डाण घेणारे विमान सायंकाळी ६.५० वाजता इंदूरला पोहोचेल आणि तेथून ७.१५ वाजता निघून रात्री ७.५५ वाजता जळगावला येईल. तसेच, जळगावहून रात्री ८.२० वाजता निघणारे विमान ९.०० वाजता इंदूरला पोहोचेल आणि तेथून ९.२५ वाजता उड्डाण घेऊन रात्री ११.३० वाजता दिल्लीला पोहोचेल. या नव्या सेवेने जळगाव–दिल्ली तसेच जळगाव–इंदूर दरम्यानच्या प्रवासाला गती मिळणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif