Wednesday, August 10, 2022

सिम कार्ड बंदच्या नावाखाली डॉक्टरला २४ हजारात गंडवले

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील महावीर नगर येथील डॉक्टराची सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून सायबर चोरट्याने २४ हजार ९०० रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल करयात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील महावीर नगरातील रहिवासी कुणाल सुरेश चौधरी हे एका खासगी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार २४ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर ‘सिम २४ तासात बंद होणार आहे, तर त्वरित खालच्या नंबरवर संपर्क साधा’ असे मेसेज आला.

त्यावर त्यांनी संपर्क केला असता त्यांच्या बँक खात्यातून २४ हजार ९०० रूपये ऑनलाईन पध्दतीने कमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या