धक्कादायक.. जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून जळगावातून धक्कादायक घटना समोर आलीय.  जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर आज भल्या पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

जळगाव शहर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांसह तब्बल २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून. जळगाव शहरातील मेहरूण परिसरात आज अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा संपूर्ण पंचनामा केला असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.