Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीत
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या विहरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना रविवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पुजा भीमराव पवार (वय २६, रा. मोहाडी) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पुजा भीमराव पवार ही तरुणी मोहाडी येथे परिवारासह राहत होती. १७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात सर्व जण झोपलेले असतांना तरुणी घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नसल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    दरम्यान रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत जवळील विहरीमध्ये ग्रामस्थांना तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतीलाल पवार, सुद्धोधन ढवळे, जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह विहरीतून बाहेर काढला.

    यावेळी ही तरुणी गावातीलच असल्याने तिची ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif