10 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 6 जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी 6 डिसेंबर रोजी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील वाघ नगरमधील माहेर असलेल्या योगिता प्रशांत सावळे (वय 30) यांचा विवाह मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथील प्रशांत चांगो सावळे यांच्याशी सन 2021 मध्ये रीतीरीजानुसार झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतरच पती प्रशांत सावळे याने विवाहितेला नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आण अशी मागणी केली.

विवाहितेने पैसे न आणल्याचा राग मनात धरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. यासाठी सासू, नणंद, नंदोई यांनी देखील पैशाचा तगादा लावला. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहिता ह्या माहेरी निघून आल्या. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी 6 डिसेंबर रोजी पती प्रशांत चांगो सावळे, सासू विमल चांगो सावळे, नणंद रेखा सोपान खराटे, नंदोई भाऊ सोपान मधुकर खराटे, नणंद मीना विनोद वानखेडे, नंदोई विनोद श्रीराम वानखेडे सर्व रा. चिंचखेडा ता. मुक्ताईनगर या 6 जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.