Wednesday, August 10, 2022

तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील शाहू नगरात मागील भांडण्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घटना घडली आहे.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शेख अकील शेख अकबर (वय ३७, रा. मदिना किरणा जवळ, शाहु नगर, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतो. मिस्तरी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १४ जून रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शेख अकील हा पायी फिरत असतांना मागील भांडणावरून उस्मानिय पार्क येथील राहणारा अजूरद्दीन शेख सलीम हा अचानक मागून येवून हातातील लोखंडी पट्टीने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

या मारहाणीत शेख अकील याच्या हाताला दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत शेख अकील शेख अकबर याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजुरद्दीन शेख सलीम याच्या विरोधात बुधवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या