१५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील कानळदा गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कानळदा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह राहते. अल्पवयीन मुलीचे वडील शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. अल्पवयीन मुली २२ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता घरी असतांना ती अचानक बेपत्ता झाली. मुलीच्या पालकांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला मुलगी कुठेही आढळून आली नाही.

गावात राहणारा भावेश बळीराम बोरसे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सोमवार २४ मे रोजी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात संशयित आरोपी भावेश बळीराम बोरसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.