जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील सुभाष चौकात एका महिलेच्या भाजीपालाच्या पिशवीला पायाचा धक्का लागल्याने दोन जणांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश मुकुंदा कासार (वय ३८, रा. रथ चौक, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतो. गुरूवार १९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील सुभाष चौकात ते दुचाकीने आले होते. दरम्यान दुचाकीवरून उतरत असतांना त्यांचा पाय एका महिलेच्या भाजीपाल्याच्या पिशवीला लागला. या कारणावरून शोऐब शह लसूनवाला आणि सिंकंदर लंगड्या ऑटोवाला (पुर्ण नाव माहित नाही) यांनी दुचाकीवरील तरूणाला बेदम मारहाण करून जखमी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी निलेश कासार याने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २० मे रोजी दुपारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.