Wednesday, August 17, 2022

तरूणीला खोलीत डांबून ठेवत विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीच होवू देणार नाही’, असे म्हणत शहरातील एका भागात तरुणाने विवाहित तरुणीला खोलीत डांबून ठेवत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. एकटेच नाही तर तरुणाने तरुणीच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव शहरातील एका भागातील २० वर्षीय विवाहित तरुणी १२ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता घराकडे जात होती. यावेळी निखील वना सोनवणे (आहुजा नगर निमखेडी, जळगाव) याने त्याच्या जवळील मोटार सायकल रस्त्यात आडवी लावून तरुणीजवळ येवून रस्ता अडवून म्हणाला कि, “तू माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होवू देणार नाही” असे म्हणून त्याने त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखविला.

तसेच तरुणीच्या हातातील फोन हिसकावून घेतला. त्यानंतर मोटार सायकलीवर बसवून शिवाजी नगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेवून तरुणीला एका खोलीत कोंडून ठेवले. दरम्यान, १९ मे २०२२ रोजी सकाळी ५ वाजता तरुणीच्या राहत्या घराचे वॉलकंपाऊंडची भिंतीवरून उडी मारून हातात काचेची बाटली आणून पिडीत तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. तसेच पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान याप्रकरणी शुक्रवार २० मे रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात निखिल सोनवणे (रा.अहुजा नगर निमखेडी जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या