Sunday, May 29, 2022

तरुणीला लैंगिक सुखाची मागणी करत विनयभंग; चौघे अटक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षण घेत असलेल्या तरूणीला लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

१९ वर्षीय पिडीत तरुणी ही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहे. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. दरम्यान ११ जानेवारी ते १३ मे दरम्यान पिडीत मुलीला देवेंद्र भागवत पाटील (वय २१, रा. नायगाव ता.यावल), अजय मनोज माळी (वय २०, रा. तळेगाव ता. जामनेर), कमलेश भटू भामरे (वय १९, रा. सुराजय ता. शिंदखेडा जि.धुळे) आणि अभिषेक रमेश बाविस्कर (वय १९, रा. फर्दापूर ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांनी वेळोवेळी तरूणीशी अंगलट करत उघडपणे लैंगिक सुखाची मागणी करत होते.

या छळाला कंटाळून तरूणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या