दाम्पत्याला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील मुकुंदनगर येथे घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजनाबाई युवराज महाजन (वय ४२, रा. हरिविठ्ठल नगर रोड, मुकुंद नगर, जळगाव) हे आपल्या पतीसह राहतात. बुधवार ११ मे रोजी रात्री ७ वाजता रंजनाबाई महाजन या घरी बसलेल्या होत्या. त्यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे नामदार तडवी (पुर्ण नाव माहीत नाही), शेखर नामदार तडवी आणि मनीषा शेखर तडवी सर्व राहणार मुकुंदनगर या तिघांनी रंजनाबाई महाजन यांच्यासह त्यांचे पती योगराज महाजन यांना बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

या मारहाणीत मनीषा तडवी हिने रंजनाबाई महाजन यांना वीट मरून फेकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दरम्यान रंजनाबाई महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नामदार तडवी, शेखर नामदार तडवी आणि मनीषा शेखर तडवी यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गबाले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here