Friday, December 9, 2022

दारूच्या पैशांवरून बिअरची बाटली डोक्यात फोडली; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील रेस्टॉरंट बारमध्ये पैसे मागण्यावरून व्यवस्थापकाला शिवीगाळ करून डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील प्रताप नगरातील वुडलँड रेस्टॉरंट येथे व्यवस्थापक म्हणून विठ्ठल सुपडू कोळी (वय ३२, रा. अयोध्या नगर जळगाव) हे काम पाहतात. गुरूवार ५ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दारूचे पार्सल घेण्यासाठी पंकज अंबादास सोनवणे हा तिथे आला. त्याने विठ्ठल कोळी यांना दारूचे पार्सल मागितले. पार्सल दिल्यावर पार्सलचे एकुण ६९० रूपये मागितले. याचा राग आल्याने पंकज सोनवणे यांने शिवीगाळ करून रेस्टॉरंट बाहेर निघून गेला. बाहेर दुचाकीची तोडफोड केली.

- Advertisement -

दरम्यान त्यांना आवरण्यासाठी विठ्ठल कोळी गेले असता त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली डोक्यावर मारली. यात विठ्ठल कोळी हे जखमी होवून बेशुध्द झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी विठ्ठल कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंकज सोनवणे रा. कांचन नगर जळगाव याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या