वेटरचा गल्ल्यावर हात साफ; पोलिसांनी केले अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील कानळदा गावात असलेल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने गल्ल्यातून रोकड व मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सागर किशोर ठाकरे (वय २१ रा. कानळदा, जळगाव) या संशयित आरोपीला अटक केली आहे.

तालुक्यातील नांद्रा बुद्रूक विजय भिकनराव सोनवणे यांची कानळदा गावात उत्कर्ष नावाने हॉटेल आहे. यात हॉटलमध्ये काम करणारा वेटर सागर ठाकरे याने हॉटेलातील गल्ल्यातून ७० हजारांची रोकड तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स लंपास केल्याची घटना गुरुवारी २८ एप्रिल रोजी उघडकीस आली होती.

याप्रकरणी हॉटेल मालक विजय सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संशयित वेटर सागर ठाकरे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here