Sunday, May 29, 2022

विवाहितेचा साडेतीन लाखासाठी छळ; ४ जणांवर गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव रामेश्वर कॉलनी येथे माहेर असलेल्या विवाहितेला साडेतीन लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडच्या लोकांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा तुषार हिप्पर (वय २३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार ज्ञानेश्वर हिप्पर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता या माहेरी रामेश्वर कॉलनी जळगाव येथील निघून आल्या. बुधवार १६ एप्रिल रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार ज्ञानेश्वर हिप्पर, मंगलाबाई ज्ञानेश्वर हिप्पर, ज्ञानेश्वर आनंदा हिप्पर आणि अक्षय ज्ञानेश्वर हिप्पर सर्व रा. मनमाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या