Tuesday, May 24, 2022

रस्ता अडवून तरुणाला फायटरने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेट्वर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील हनुमान मंदीर चौकात तरूणाचा रस्ता अडवून फायटरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातील शंकरराव नगर येथील रहिवासी असलेला महेश उर्फ मुकेश राजू निंबाळकर (वय २४) हा मजूरी करुन उदनिर्वाह करतो. शुक्रवारी १ एप्रिल रोजी रात्री तो चौघुले प्लॉट परिसरात राहत असलेल्या त्याच्या आत्याकडे जेवणासाठी जात होता. याचवेळी हनुमान मंदिराच्या चौकात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या व गोलू परदेशी हे दोघ भेटले.

“सध्या तु खुप हवेत उडत आहे” असे म्हणत ते महेशला शिवीगाळ करु लागले. दरम्यान, त्या दोघांना महेश समजविण्यासाठी गेला असता, गोलू परदेशी याने महेशला पकडून ठेवले तर राकेश याने त्याच्या हातातील फायटरने चेहर्‍यावर व कपाळावर मारुन दुखापत करीत गंभीर जखमी केले.

याप्रकरणी महेश निंबाळकर याने शनिपेठ पोलिसात फिर्याद दिल्याने राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या, गोलू परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या