पादचाऱ्या विद्यार्थ्यांचा धूमस्टाईल ने लांबविला मोबाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव ; शहरातील गणेश कॉलनीतील खॉजामियॉ चौकाजवळ पायी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातातील अज्ञात तीन जणांनी दुचाकी घेऊन लांबविल्याची घटना सोमवारी ७ मार्च रोजी सायंकाळी घडली. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत अनिल साळी (वय-१८) रा. विर सावरकर नगर, पिंप्राळा हा विद्यार्थी खॉजामियॉ चौकातील वाचनालयात सोमवार ७ मार्च रोजी गेला होता.

सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वाचनालयातून घरी जाण्यासाठी पायी निघाला असता ख्वॉजामियॉ चौकात त्याच्यामागून अज्ञात तीन जणांनी दुचाकीवर येऊन त्याच्या हातातील ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून लांबविला.

याप्रकरणी तरुणाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्ष गोकुळ गवारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.