दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणाला मारहाण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील इच्छादेवी चौकात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल सुधाकर बागुल (वय-३५, रा. हनुमान नगर मेहरूण) हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. बुधवार २ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील इच्छादेवी चौकात उभा असतांना त्याठिकाणी सलीम ऊर्फ भाल्या तडवी रा. तांबापुरा जळगाव हा त्या ठिकाणी आला. आणि कुणालकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

मात्र कुणालने दारूसाठी पैसे दिले नाही, याचा राग आल्याने सलीम तडवी याने हातातील काठी ठोक्याला मारली. यात कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. यासंदर्भात गुरुवार ३ मार्च रोजी दुपारी १ वाजता संशयीत आरोपी सलीम ऊर्फ भाल्या तडवी रा. तांबापुरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.