Sunday, May 29, 2022

आईसक्रीम विक्रेत्याची तरुणाला मारहाण; ३ जणांवर गुन्हा

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील अजिंठा चौकात येथे आईसक्रीम मागण्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गणेश भगवान लोहार (वय २४, रा. राका चौक, एमआयडीसी) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतो. २२ एप्रिल रोजी गणेश हा अजिंठा चौकात आईसक्रीम घेण्यासाठी गेला होता. आईसक्रीम दुकानावरील शिवा पुरभीया याला लवकर आईसक्रीम दे असे सांगितल्याचा राग आल्याने शिवा पुरभीया, गोविंद शिवा पुरभीया आणि रामुलाल पुरभीया सर्व रा. अजिंठा चौफुली जळगाव यांनी हातात लाकडी दांडा व फायटरने गणेशला बेदम मारहाण केली.

याप्रकरणी गणेश लोहार यांनी रविवारी २४ एप्रिल रोजी रात्री संशयित आरोपी शिवा पुरभिया, गोविंद पुरभीया आणि रामलाल पुरभीया या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या