Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार..
    जळगाव

    जळगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2025Updated:May 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव शहरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार उडाला. शहरातील दूध फेडरेशन रस्त्यावर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकीमध्ये गोळीबार होऊन एका 25 वर्षीय तरुणाच्या पाठीत उजव्या बाजूस गोळी शरीरात घुसली असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच हे गावठी कट्टे आजकाल जणू खेळण्यातील बंदुकीसारखे झाले असून शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    नाजूम फिरोज पटेल (वय 25, रा. पाळधी ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारसह राहतो. त्याचा मित्र तौहिद कय्यूम देशपांडे (वय 23, रा. पाळधी ता.धरणगाव) आणि अजून 1 जण असे 3 जण दोघे बुधवारी दि. 14 मे रोजी भुसावळ येथे तृतीयपंथीयांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. काम आटोपून मध्यरात्री पाळधी येथे परत येत असताना त्यांनी महामार्ग टाळून जळगाव शहरात शिरले. शिवाजीनगर उड्डाणपुलावरून पाळधीला जाणार होते. दरम्यान शिवाजीनगर उड्डाणपूल ओलांडल्यावर पुढे जाताना कारमध्ये मागे बसलेल्या तौहिद देशपांडे याच्याकडील बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने पुढे बसलेल्या नाजुम पटेल यांच्या पाठीमध्ये ती घुसली.

    दरम्यान नाजूम पटेल याला उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले तेथे प्रथमोपचार झाल्यावर त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केले आहे. याप्रकरणी तौहिद देशपांडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif