Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात अवैध कुंटणखान्यावर छापा
    जळगाव

    जळगावात अवैध कुंटणखान्यावर छापा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेजजवळ एक महिलेने वेश्या व्यवसाय करण्यासाठी काही महिलांना आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे.

    पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif