Wednesday, September 28, 2022

इंस्टाग्रामवरील प्रेम पडले महागात; तरुणीला लग्नाचे आमिष देत अत्याचार

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष देवुन तिच्यावर अत्याचार करून सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपुर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील १९ वर्षीय युवतीवर दानिश मुलतानी (रा. गेंदालाल मिल) या तरुणाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात दानिश मुलतानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

२०२१ मध्ये इंन्टाग्रामवर संशयीत दानिश मुलतानी व त्या तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवस इंस्टाग्रामवर बोलणे झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेम संबंधाला तरुणीने नकार दिला मात्र नंतर होकार दिला. दरम्यान डिसेंबर महिन्यात दानिशने मी तुझ्याशी लग्न करेल असे आश्वासन देवून तो रामटेक येथे त्या पिडीतेला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने एका लॉजवर नेवून त्या तरुणीवर अत्याचार केला.

त्यानंतर दानिशने फोनवर त्या पिडीतेला माझ्यासोबत लग्न कर नाही, तर तुझे लग्न मोडून टाकेल अशी धमकी दिली. यावेळी त्याचा मित्र बाबू उर्फ उमर, कामील व त्याच्या मामाची मुलगी आशू यांना सांगितले. या सर्वांनी तरुणीची समजूत देखील काढली होती. पिडीत तरुणीला दानिशचे मित्र अकील हा ७ एप्रिलला गेंदालाल मिल परिसरात बाबूराव उर्फ सैफ यांच्या घरी सोडले. यावेळी घरात कोणीच नसतांना दानिशने पिडीतेवर अत्याचार केले.

दरम्यान दानिश हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तो पिडीतेला घरी निघून जाण्याबाबत जबरदस्ती करीत होता. पिडीतेला दानिशच्या मित्र अकील व कामील यांनी रेल्वेत बसविले आणि ते मलकापूर येथून गाडीतून निघून गेले. दरम्यान, पिडीता घरी गेल्यानंतर त्याठिकाणी तिच्या कुटुंबियांनी तीला घरात राहण्यास नकार दिला.

त्यामुळे पिडीता १० एप्रिलला पुन्हा जळगावला आली. यावेळी दानिशने फोन बंद करून ठेवला होता. ११ एप्रिल रोजी तरुणी नूतन मराठा महाविद्यालयाजवळ रडत असतांना काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिची विचारपूस केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यावेळी त्या पीडितेला शहर पोलिस ठाण्यात आणले.

यावेळी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन दानिश मुलतानी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल होताच पोउनि संदिप परदेशी यांच्यासह विजय निकुंभ, तेजस मराठे, योगेश इंधाटे, योगेश भांडारकर, रवी पाटील यांच्या पथकाने दानिश मुलतानी याला गेंदालाल मिल परिसरातून अटक केली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या