दोन जणांना फायटरने मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील इस्लामपूरा भागात शुल्लक कारणावरून दोन जणांना फायटरने मारहाण केल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद साजिद अली (वय ४६, रा. इस्मालपुरा, भवानीपेठ) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शुक्रवार ८ एप्रिल रोजी इस्मालपुरा भागात लाईट गेलेली होती. केबल वायर खराब झाल्याने केबल दुरूस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी दुरूस्तीसाठी आले होते. दरम्यान, ईलेक्ट्रीक केबल वायर ही गल्लीतील वसीम शेख सत्तार यांच्या घराजवळून गेली होती. केबल वायर दुरूस्तीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना वसीम शेख सत्तार याने नवीन केबल टाका आता ही वायर टाकू नका.

यावेळी सैय्यद अली यांनी हटकले. याचा राग आल्याने सैय्यद साजिद अली आणि त्यांचा भाऊ सैय्यद वाजीद सैय्यद आबिद यांना वसीम शेख सत्तार, गफ्फार शेख सत्तार, हकीम भाई यांनी फायटरने मारहाण केली. या मारहाणीत सैय्यद साजिद अली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.