जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या एका 24 वर्षे महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. सदर प्रकार 9 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील रेल्वे पुलाजवळ राहणाऱ्या एक 24 वर्षीय महिला झोपलेली असताना महिलेचे तोंड दाबून तिच्यावर जबरीने मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी (वय 40, रा. हरी विठ्ठल नगर) याने जबरदस्तीने अत्याचार करून तुला मारून टाकेल अशी धमकी दिली.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विठ्ठल पाटील करीत आहे.