Saturday, January 28, 2023

जळगावात दोन तरुणांवर चॉपरने हल्ला

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जून्या वादातून दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडली. या हल्ल्यात नितीन निंबा राठोड (वय 24) आणि सचिन कैलास चव्हाण (वय 22) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

नितीन राठोड व सचिन चव्हाण हे जळगावातील रामेश्वर कॉलनीमध्ये राहतात. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. या वादामुळे रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये काही तरुणांसोबत आला. त्याने नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. नितीनवर हल्ला होताच त्याचा आतेभाऊ सचिन हा त्याठिकाणी आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील वार करुन जखमी करत हल्लेखोर पसार झाले.

- Advertisement -

दरम्यान जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या हल्ल्यात नितीन राठोड हा गंभीर जखमी आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे