जिल्ह्यात नव्याने तब्बल 338 कोरोना बाधित; 409 जणांची कोरोनावर मात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 338 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 409 जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर भुसावळ येथे आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 3469 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 338 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 55, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 33, अमळनेर 11, चोपडा 24, भडगाव 33, धरणगाव 7, यावल 22, एरंडोल 15, जामनेर 1, पारोळा 26, चाळीसगाव 67, मुक्ताईनगर 11, बोदवड 9, इतर जिल्ह्यातील 7.

Leave A Reply

Your email address will not be published.