जिल्ह्यात नव्याने तब्बल 428 कोरोना बाधित; 526 जणांची कोरोनावर मात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 428 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 526 जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर भुसावळ, चोपडा, चाळीसगाव येथे आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 2984 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 428 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 131, जळगाव ग्रामीण 08 , भुसावळ 50, अमळनेर 41 , चोपडा 80 , पाचोरा 1 , धरणगाव 3 , यावल 12, रावेर 2 , पारोळा 3, चाळीसगाव 51, बोदवड 31, आणि इतर जिल्ह्यातील 2 .

Leave A Reply

Your email address will not be published.