जिल्ह्यात नव्याने तब्बल 414 कोरोना बाधित रुग्ण; एकाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 414 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 221 जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर भुसावळ येथे आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 3103 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 414 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 116, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 79, अमळनेर 20, चोपडा 78, पाचोरा 17, भडगाव 5, धरणगाव 4, यावल 1, एरंडोल 4, जामनेर 32, पारोळा 16, चाळीसगाव 29, इतर जिल्ह्यातील 2.

Leave A Reply

Your email address will not be published.