Tuesday, May 24, 2022

तीस हजाराची लाच घेतांना शिपाई एसीबीच्या जाळ्यात !

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

तीस हजाराची लाच घेतांना आज सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

- Advertisement -

गोपाळ कडू चौधरी असे या शिपायाचे नाव आहे. बेरोजगार व्यक्तीला नोकरीची ऑर्डर मिळवून देण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपयांपैकी तीस हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता त्याला भोवला.

जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव या कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या तक्रारदाराने कंत्राटी सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी अर्ज केला होता.

कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई गोपाळ चौधरी याने तीस हजाराची लाच घेताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

डीवायएसपी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. दिनेशसिंग पाटील, स. फौ. सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहीरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो. हे. कॉ. रविंद्र घुगे, म. पो. हे. कॉ. शैला धनगर, पो. ना. मनोज जोशी, पो. ना. जनार्धन चौधरी, पो. ना. सुनिल शिरसाठ, पो. कॉ. प्रविण पाटील, पो. कॉ. महेश सोमवंशी, पो. कॉ. नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर पो. कॉ. प्रदिप पोळ या पथकाने सदर कारवाई केली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या