शासकीय रुग्णालयातून लॅपटॉप, दोन मोबाईल लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावातील मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमधील कार्यालयातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये अशोक नाथू पासवान (वय ४२, रा. धरमपुरा ठिका ता.जि. वैशाली बिहार ह.मु. मोहाडी शासकीय हॉस्पिटल) हे सेंटींग काम करतात. बुधवार ११ मे रेाजी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या शासकीय हॉस्पिटलच्या कार्यालयात ठेवलेले १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शत्रुघन मनौत महतो रा. तुरकी चरूवा जि. मुझफरपूर, बिहार यांने चोरून नेल्याचा संशय संशय अशोक पासवान यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान याप्रकरणी अशोक पासवान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार १२ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.