द बर्निंग कार.. जळगावात कारला भीषण आग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज सकाळी एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण कार जाळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून या आगीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला, परंतु सुदैवाने या घटनेत कोणालाही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आदर्शननगरमध्ये  गुरूमीत सिंग हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. नेहमीप्रमाणे गुरूमीत सिंग हे आपल्या कार क्रमांक (एमएच १९ बीयू ३००१) ने महाबळ परिसरात लांडोरखोरी येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी मोहाडी रस्त्यावर कार उभी केली असता कारमध्ये शार्टसर्कीट झाल्याने सुरूवातीला धुर निघाला आणि त्यानंतर क्षणात कारने पेट घेतला. कारने पेट घेतल्यानंतर त्यांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कार संपुर्ण जळून खाक झाली होती. या आगीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून कोणालाही शारीरिक इजा झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.