Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»२० हजाराची लाच भोवली.. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता अटकेत
    गुन्हे वार्ता

    २० हजाराची लाच भोवली.. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 22, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे.  महावितरण कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. प्रशांत प्रभाकर इंगळे (वय ४६, रा. भुसावळ) असे अटक केलेल्या उपकार्यकारी अभियंता याचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवासी असून ते शासकीय विद्युत ठेकेदार म्हणून ते काम करतात. त्यांनी एका खाजगी कंपनीचा एलएससीच्या स्कीम अंतर्गत नवीन सर्विस कनेक्शन क्षमता वाढ 100 वॅट वरून 200 वॅट करण्याकरता प्रस्ताव भुसावळ येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्याकडे सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उपअभियंता उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.

    दरम्यान तडजोडी अंती अखेर 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदर यांनी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाला या संदर्भात तक्रार केली. पथकाने बुधवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांना 20 हजार रुपये घेताना रंगेहाथ  पकडले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bribe jalgaon Mahavitaran
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif