मंत्री नवाब मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा; भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलीक यांचा मंत्रीमंडळासह राष्ट्रवादी पक्षाने मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

सदर निवेदनात नमूद केले आहे की, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बॉम्बस्फोट गुन्हेगारांची संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब शरद पवार यांनी घेतला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांचा बाबतीत वेगळा निर्णय करत आहे. असे दिसून येत आहे

कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचे जबाब हे कारागृहातून जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, मंत्र्यांच्या राजीनामा घेणार नसतील तर राजकारणाचा स्तर खालावेल, देशाच्या शत्रुला मदत करणारे मंत्रिमंडळ देशाला चालणार नाही. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. राष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यात तीव्र निदर्शने करेल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, नगरसेविका तथा प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, नगरसेविका दिपमाला काळे, सुचिता हाडा, राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाटी, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.