Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»तापमान वाढीमुळे केळी होणार नामशेष ?
    कृषी

    तापमान वाढीमुळे केळी होणार नामशेष ?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 20, 2025Updated:May 20, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही विशेष (दीपक कुळकर्णी)

    हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानासह विविध नैसर्गिक आपत्तींचा जगभरातील शेतीला मोठा फटका बसतो आहे. अतिवृष्टी, अति उष्णता, अति थंडीसह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका केळी पिकाला बसतो आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील 60 टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे केळी उत्पादक संकटात सापडला असून केळी उत्पादकांना उभारी देण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक झालेले आहे.

    ‘ख्रिश्चन एड’ या संशोधन संस्थेने ‘गोइंग बनानाज : हाउ क्लाइमेट चेंज थ्रेट्स द वर्ल्ड्स फेवरेट फ्रूट’ या संशोधन अहवालात हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तापमान वाढीचा केळी पिकावरील परिणामांचा आढावा घेतला आहे. त्यात म्हटले आहे. केळी हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर सर्वाधिक आयात होणारे फळ आहे.

    जागतिक व्यापाराच्या आणि पोषण मूल्याच्या दृष्टीनेही केळी महत्त्वपूर्ण ठरली आहे. पण, हवामान बदलामुळे प्रामुख्याने तापमान वाढीसह अति थंडी, गारपीट, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे लॉटिन अमेरिका, कॅरेबियन देशांना तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसत असून, 2080 पर्यंत एकूण केळी लागवडीपैकी 80 टक्के आणि जगातील अन्य केळी उत्पादक देशांमधील 60 टक्के क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. सध्या एकूण जागतिक केळी लागवडीच्या 60 टक्के क्षेत्राला तापमान वाढीच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे. तापमान वाढीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढतो. केळीचे खोड, झाड कमकुवत होते. अशा काळात वादळी वारे, सोसायट्याचा वारे वाहिल्यास केळीची झाडे उन्मळून पडतात. तापमान वाढीमुळे ब्लॅक लीफ फंगस या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, ही बुरशी केळीसाठी धोकादायक ठरत आहे. ब्लॅक लीफ फंगसमुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत तब्बल 80 टक्के कमी होते. ओलसर जागेत वेगाने प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सध्या जगभरात तापमान वाढीमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत.

     

    जळगावला मोठा फटका

    केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. जळगावची केळी सातासमुद्रापार प्रसिद्ध असून येथील केळीला आंतररराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून विविध संकटांमुळे केळी आणि केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडल्यामुळे केळीच्या लागवडीत घट दिसून येत आहे.

    banana farming jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif