जळगाव जिल्ह्यातील अजित पवार गटातील बंडखोरांना धक्का

थेट कारवाईचे प्रस्ताव, यांच्यावर होणार कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.  जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील बंडखोरांना मोठा धक्का बसला आहे. थेट कारवाईसाठी प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे.

 

कोणावर होणार कारवाई ?

अजित पवार गटाने बंडखोरी करणारे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष अमित पाटील, पारोळ्याचे डॉ. संभाजीराजे पाटील या बंडखोरांसह त्यांना मदत करणारे एरंडोल व पारोळा येथील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.

पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या कोट्यातून जिल्हा नियोजन मंडळावर घेण्यात आलेले आहे. वाघ यापूर्वीही कधी शरद पवार गटात, तर कधी अजित पवार गटात राहिले होते. एरंडोल-पारोळा मतदारसंघातून डॉ. संभाजी राजे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. याशिवाय तिघंही बंडखोरांना पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी मदत करीत आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.