Wednesday, September 28, 2022

दाम्पत्याला स्कूलबसची जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पहाटे शतपावली करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसने जोरदार धडक दिली. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी असलेले गफ्फार सुलेमान पिंजारी (वय ५४) यांच्या अपघातात जागीच मृत्यू झाला तर रईसाबी पिंजारी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

गफ्फार पिंजारी हे पत्नी रईसाबी व मुलांसह सुप्रिम कॉलनीत राहतात. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर रोज पहाटे ते शतपावली करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गफ्फार पिंजारी व त्यांची पत्नी रईसाबी हे दोघे शतपावली करण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील नेक्सा शोरूम समोर पिंजारी दाम्पत्य पायी जात असतांना मागून (एमएच १९ डीवाय ९०३४) या क्रमांकाच्या टाटा मॅजीक स्कूलबसने जोरदार धडक दिली.

या धडकेत गफ्फार पिंजारी हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी रईसाबी ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेतली. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता गफ्फार पिंजारी यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

मयताच्या पश्चात चार मुले, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी जाफर गफ्फार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या