Thursday, September 29, 2022

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव- भुसावळ महामार्गावर असलेल्या बुलेट शोरूम समोर २७ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सागर विजय राणे (वय ३०, रा. हिंगोणा ता. यावल ह.मु. जळगाव) हा तरुण जळगाव शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. दरम्यान २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सागर राणे हा कामाच्या निमित्ताने दुचाकीने हिंगोणा येथे राहत्या घरी गेला होता. त्यानंतर रात्री दुचाकीने परत जळगावकडे येत असताना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून शहरात येत असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सागर राणे हा तरुण जागीच ठार झाला आहे.

यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जिल्ला शासकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी पल्लवी, आई चारूलता, वडील विजय वासुदेव राणे असा परिवार आहे. सागर हा एकुलता एक मुलगा होता.

याप्रकरणी शरद रमेश जावळे वय (वय ४६, रा. रोझोदा ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या