Saturday, October 1, 2022

दुचाकीला भरधाव वाहनाची धडक, दोन जण जखमी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रोडवर असलेल्या सेंट टेरेसा स्कूलजवळ बुधवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

बापू दौलत सोनवणे (वय ४५) आणि त्यांचा सहकारी चंद्रकांत विठ्ठल मोरे दोन्ही रा. राजमालती नगर, दुध फेडरेशन जवळ, जळगाव हे दोघे आचारीचे काम करतात. २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी (एमएच १९ एमएच ९३४०) ने शिरसोलीकडून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात बापू सोनवणे आणि चंद्रकांत मोरे हे दोघेजण जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चारचाकी वाहन चालका विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या