Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अपघात.. राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली, २ जणांचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    अपघात.. राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली, २ जणांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2023Updated:September 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील पिंपळकोठा येथे राष्ट्रीय महामार्गवरून जाणारी खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात बारा प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

    तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ आज मोठा अपघात झाला. यात एरंडोल ते जळगाव दरम्यान पिंपळकोठा गावाजवळ ३० प्रवासी असलेल्या स्लीपर लक्झरीचा अपघात झाल्याने २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊच्या समारास घडले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे.

    या संदर्भात माहिती अशी की, जळगाव ते एरंडोल दरम्यान असलेल्या पिंपळकोठा गावाजवळ चौधरी कंपनीच्या लक्झरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस ही नाल्याच्या खाली जाऊन कोसळल्याची घटना शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात झाला. यात बसमधील बारा प्रवासी जखमी झाली असून यातील दोघे जण ठार झाले आहेत.

    जखमी प्रवाशांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यास मदत केली.

    या अपघातात दिपेंद्र कुमार, दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सिताराम कुमार, मुकेश गुजर, लक्ष्मी जांगेड आणि दोन अनोळखी असे १२ जण जखमी झाले आहे. शेवटची वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

    संबंधीत बस ही श्री चौधरी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती. या बसचा क्रमांक एआर ०१ वाय ०००९ हा होता. पोलिसांनी या संदर्भात बस चालकाकडून माहिती मिळवून तपास करण्यास प्रारंभ केला आहे. तर, जखमी प्रवाशांच्या आप्तांना देखील माहिती देण्यात आली आहे.

    अपघात प्रकरणी रतनलाल कुमावत यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून लक्झरी गाडीचा चालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंद वाडकर व एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

    Accident News jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif