जळगावात डंपर-ट्रॅक्टरच्या भीषण अपघात

तरुण जागीच ठार; तीन जण जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने  दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. अंकुश आत्माराम भिल (वय २७, रा. डिकसाई, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या ,माहितीनुसार, जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ एएन २९०६ विटा घेऊन जात असताना तेथील वळणजवळ मागून येणाऱ्या डंपर हा ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला कट मारला तेवढ्यात ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.  तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल (वय २२),  गणेश भगीरथ भिल (वय १८) आणि शुभम सुखा भिल (वय २०) तिघे राहणार इदगाव ता. जळगाव हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत अंकुशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.