Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात
    गुन्हे वार्ता

    लाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 24, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पाचोरा तालुक्यातील वरसाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सरपंच पतीला जळगाव एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच अटक करण्यात आले आहे.

    आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यशस्वी झालेल्या सापळ्यात काशीनाथ राजधर सोनवणे (52, रा.प्लॉट नं.3, शिवनेरी नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) व महिला सरपंच पती शिवदास भुरा राठोड (67, रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांना अटक करण्यात आली.

    41 वर्षीय तक्रारदाराने ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणार्‍या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले आहे. या कामापोटी त्यांना मानधन मिळणार होते मात्र त्यासाठी मिळणार्‍या धनादेशावर सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ग्रामसेवक काशीनाथ सोनवणे यांनी महिला सरपंच पती शिवदास राठोड यांच्यासाठी सहा हजारांची लाच मागितली मात्र चार हजारावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे मंगळवार, 24 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी राठोड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.

    हा सापळा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग के.बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्दन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

     

    #pachora Anti Corruption Bureau crime news Jalgaon ACB
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif