हिंदीच्या प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. वासंती मधुकर साळवेकर यांचे निधन

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

मु. जे.महाविद्यालयाच्या माजी हिंदी विभाग प्रमुख आणि हिंदीच्या प्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ. वासंती साळवेकर यांचे काल ४ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री 11 .42 वा.वयाच्या 83 व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.

त्या महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी ,महाराष्ट्र हिंदी परिषद , महाराष्ट्र प्राध्यापिका परिषद , आदी संस्थांवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या. वासंती साळवेकर यांनी कर्नाटक संगीत के प्रणेता संत पुरंदरदास ,नथुराम शंकर कि काव्य साधना , काव्यसमीक्षा के भारतीय मापदंड , लालबहादूर शास्त्री मेरी निगहो मै हा मराठी ते हिंदी अनुवाद , स्वातंत्रोत्तर हिंदी काव्य , स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर घेतलेले आक्षेप , यावर मराठीतून हिंदी अनुवाद केला असून त्यांनी अनेक निबंध पुष्पांजली यामध्ये मौली धरती ,मौला आकाश, संत तुकाराम कि अभंगवाणी , संत एकनाथ यांचे निवडक पत्रे , संत तुकाराम अभंगवाणी , यासह विविध परिसंवादमध्ये सहभाग , वृत्तपत्र मासिकांमध्ये विपुल लेखन केले आहे. , तसेच विविध विषयांवर समीक्षण लेख, आदी प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला.आहे.

प्रा. डॉ. वासंती साळवेकर यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये ..

सरस्वती समभ्यर्चना, भारती परिषद प्रयाग – 2004
प्रज्ञा भारती – हिंदी साहित्य संमेलन प्रयाग – 2006
साहित्यशिरोमणी- अखिल भारतीय हिंदी सेवा संस्थान इलाहाबाद 2007
हिंदी प्रचार संघ, वर्धा , अमृत महोत्सवी वर्ष सन्मान , पुणे 2005
साहित्य-सेवा-सम्माम- महाराष्ट्‌ राष्ट्रभाषा प्रचार समिति ,पुणे 2011
संत एकनाथ जयंतीनिमित्त विवेकानन्द केंद्र , मराठी
प्रकाशन विभाग, पुणे द्वारा सन्मान 2014
साहित्य सेवी पुरस्कार -महाराष्ट्‌ राष्ट्रभाषा प्रचार समिती पुणे 2016

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here