जळगावात घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लांबविला !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील रायसोनीनगरातील एका अपार्टमेन्टमधून अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे अडीच लाखाचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत पाटील हे एसटी महामंडळात नोकरीला असून ते रायसोनी नगरातील निसर्गसुंदर अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांचे महाबळ परिसरात कटलरीचे दुकान असल्याने ते पत्नीसोबत दुकानावर गेले होते. दुपारी जेवणासाठी ते घरी आले असता, त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसले नाही तर दरवाजाला केवळ कडीकोयंडा दिसून आला. त्यांनी घरात जावून बघितले असता, घरातील कपाट उघडे होते तर त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी हेमंत पाटील यांच्या घरातून सोन्याची मंगलपोत, कानातले, चैन, अंगठी, सोन्याचा कॉईन यासह रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबविला.

Leave A Reply

Your email address will not be published.