सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील विविध व्हॉटस अॅप ग्रुप द्वारे अल्पसंख्यांक समाजाबाबत अत्यंत घाणरडे व समाज मन बिघडविणारे संदेश व्हायरल होत आहे. त्या क्लिपमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

दि. २३ मार्च २०२२ वार बुधवार रोजी आयोनक्समध्ये शहरातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या युवतींना दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याठिकाणी अज्ञात एका महिलेने थांबून महिलांना एकत्रीत केले व अत्यंत घृणास्पद व दोन समाजात निर्माण होणारे भाष्य केले. त्यात तिने प्रामुख्याने मुस्लिम समाजाने कशाप्रकारे आपल्या हिंदू समाजातील मुलींना प्रेमात ओढून त्यांच्याशी अनैतिक व्यवहार केलेला आहे. एवढेच नव्हेतर ते हिंदू मुलींना अडकवतात असे सांगून स्पष्टकरण दिले की, जळगांव शहरात एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणींशी विवाह केला तिसऱ्या दिवशी तिला मारुन रस्त्यावर फेकुन दिले. तसेच तिने पुढे असे म्हटले की, मुस्लिम समाजाच्या दुकानातून किंवा मुस्लिम व्यापाऱ्याकडून कोणतेही सामान खरेदी करु नका. चार पैसे जास्त द्यावे लागतील तर ते द्या पण हिंदू माणसांकडून खरेदी करा. मुस्लिम दर्गावर जावु नका, त्या ठिकाणी सुद्धा अनैतिक कार्ये होतात. जायचे असेल तर नारायण पुर येथे जा. आज काश्मीर फाईल सिनेमा आलेला आहे. उद्या महाराष्ट्र फाईल्स सुद्धा येवु शकते. अशा प्रकारचे हेट स्पिच वक्तव्य करुन त्या महिलेने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तसेच सुभाषचंद्र बोस रिक्षा ग्रुप या व्हॉटस अॅप ग्रुप मध्ये मोबाईल क्र. ९९ २२३८३२२४ वरुन एक मेसेज व्हायरल होत आहे. रमजान विषयी अत्यंत घाणेरेडा व मन दुखविणारा मेसेज आहे. उपरोक्त दोन्ही मेसेज हेट स्पिच व्हायरल होत असल्याने आपण त्वरीत ते थांबविण्यात यावे व दोन्ही मेसेज टाकणारे आणि फारवर्ड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

असे आशयाचे निवेदन महा. राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल फोरम प्रतिभा शिरसाठ, महिला सुरक्षा समिती सदस्य निवेदिता ताठे, वंचित आघाडी नसरुल फातेमा पिरजादे, जनक्रांती मोर्चा मुंकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चा भरत कार्डिले, मणियार बिरादरी जळगाव फारुक शेख, मनियार बिरादरी, महा. प्रदेश युवक काँग्रेस, सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक मझहर पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.