अपक्ष उमेदवारांवर दबावाची चर्चा (पहा व्हिडीओ )
जळगाव प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून आज शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडत असल्याची चर्चा आहे.
या संदर्भातील एक व्हिडीओ समाज माध्यमांवर झळकत आहे. माध्यम प्रतिनिधी इच्छुक उमेदवाराला माघार का घेत आहेत? असे विचारल्यावर उमेदवाराऐवजी एका पक्षाचा पुढारीच बोलत असल्याचे दिसून येत आहे. इच्छुक आजी आणि नातू रडतरडतच महापालिकेच्या प्रांगणातून बाहेर पडले.