Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ग.स. सोसायटीच्या भरतीची स्थगिती अवघ्या २४ तासांत उठवली
    गुन्हे वार्ता

    ग.स. सोसायटीच्या भरतीची स्थगिती अवघ्या २४ तासांत उठवली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ग.स. सोसायटीच्या भरतीची स्थगिती अवघ्या २४ तासांत उठवली

    संस्थेची माहिती समाधानकारक; आजपासून मुलाखती

    जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात गस सोसायटीच्या नोकरभरतीवरून निर्माण झालेल्या वादानंतर दि. १८ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी पुढील आदेश येईपर्यंत भरती स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, संस्थेने मागविलेल्या पाच मुद्द्यांवरील माहिती सादर करताच अवघ्या २४ तासांत ही स्थगिती उठवण्यात आली असून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आज शनिवार दि. २० पासून या भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
    गस सोसायटीच्या या भरतीबाबत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तीव्र चर्चा सुरू होती. ऑनलाईन अर्ज मागवून लेखी परीक्षा न घेता केवळ तोंडी परीक्षा घेऊन भरती करण्याचा घाट असल्याचे आरोप करण्यात आले होते. शिवसेना (शिंदे गट)चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही भरती रद्द करण्याची अथवा नामांकित एजन्सीकडून पारदर्शक पद्धतीने घेण्याची मागणी सहकार मंत्र्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवरच जिल्हा उपनिबंधकांनी तात्पुरती स्थगिती दिली होती.

    पाच मुद्द्यांवर माहिती सादर
    भरतीसाठी प्रस्ताव सादर करताना सभासद संख्या, सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्त पदे आदी पाच मुद्द्यांवरील सविस्तर माहिती देण्याचे आदेश संस्थेला देण्यात आले होते. त्यानुसार गस सोसायटीने ही माहिती सादर केली असून ती समाधानकारक असल्याचा शेरा नोंदवत जिल्हा उपनिबंधकांनी भरतीवरील स्थगिती उठवली आहे. भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबवली होती, त्याच टप्प्यापासून पुढे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    लेखी की तोंडी परीक्षेबाबत संभ्रम कायम
    या भरतीत केवळ तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याने आर्थिक उलाढालीची चर्चा रंगली होती. संचालक मंडळाने सहकार विभागाच्या पत्राचा आधार घेतल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात लेखी परीक्षा होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

    २६०० अर्ज, ६६ पदांची भरती
    गस सोसायटीच्या या भरतीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लिपिक पदासाठी १,४८७ तर शिपाई पदासाठी १,११३ असे एकूण सुमारे २,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण ६६ पदे भरली जाणार असून आजपासून मुलाखती घेण्यात येणार आहेत.
    दरम्यान, स्थगिती दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती उठवण्यात आल्याने जिल्ह्यात विविध चर्चा सुरू आहेत. संचालक मंडळाने ‘सूत्रे हलवून’ ही स्थगिती उठवली, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू असून या भरती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif